पंचायत समिती वेंगुर्ला च्या संकेतस्थळा वर आपले स्वागत आहे !!
वेंगुर्ला हे शहर समुद्रकिनारी वसलेले ऐतिहासिक शहर असून त्यास संपन्न परंपरा लाभली आहे. वेंगुर्ला शहराची मुख्य ओळख एक व्यापारी बंदर म्हणून होती. परंतु आता केवळ एक मासेमारी बंदर अशीच त्याची ओळख उरली आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. महाराष्ट्रातील तुलनेने कमी प्रदूषित समुद्रकिनाऱ्यांमध्ये याची गणना होते.
अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वेंगुर्ला शहराची नवीन ओळख ही वेगाने विकसित होणारे पर्यटनस्थळ म्हणूनच करून द्यायला हवी.
१८५६ पासून नगरपालिका आणि १८७१ पासून नगर वाचनालय असलेल्या वेंगुर्ला शहराची शैक्षणिक परंपरा उच्च नसली तरच नवल. आजच्या वेंगुर्ल्यात वेंगुर्ला होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, बॅ.खर्डेकर कॉलेज, पाटकर हायस्कूल, रा.सी.रेगे जुनियर कॉलेज आणि वेंगुर्ला हायस्कूल या संस्था शैक्षणिक कार्य करतात.
प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे हे गाव आहे. या गावाची ओढ शरद पवार यांसारख्या अनेक मान्यवरांना आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्मही वेंगुर्ल्यातच झाला होता.
एकेकाळचे प्रमुख व्यापारी बंदर असल्यामुळे वेंगुर्ल्यात देवस्थानांना संपन्नता लाभली आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. विविध देवस्थानांच्या वार्षिक जत्रा आणि त्यानिमित्त होणारे दशावतारी नाट्यप्रयोग अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात.
क्र. | घटक | माहिती |
---|---|---|
1 | क्षेत्रफळ | 27,832 हेक्टर |
2 | एकूण गावे | 83 |
3 | एकूण लोकसंख्या | 73,450 |
4 | ग्रामपंचायती | 30 |
5 | फळपीक क्षेत्र | 8586.83 हे. |
फुलपीक क्षेत्र | 0.00 हे. | |
भाजीपाला | 122.01 हे. | |
मसाला पीक | 45.95 हे. | |
6 | पर्जन्यमान | 2844.00 मि.मि. |
7 | आरोग्य केंद्रे | 4 |
8 | उपकेंद्रे | 22 |
9 | अॅलोपॅथिक दवाखाने | -- |
10 | आयुर्वेदिक दवाखाने | 1 (फिरता) |
11 | पशू चिकित्सालये | 1 |
12 | पशू उपचार केंद्रे | 2 |
13 | प्राथमिक शाळा | 133 |
14 | अंगणवाडी | 147 |